जेव्हा मी नसेन.....

Image : Shruti Mankar

जेव्हा मी नसेन, ही संध्याकाळ अशीच असणार
तो गर्द नारंगी क्षितिजावर तसाच सजणार..
पक्ष्यांचा थवा, घरट्याची वाट धरणार..
सगळे परततील मात्र मी त्यात नसणार..
काही ओल्या पापण्या थोड्या जड वाटणार..
मनाच्या नात्यांना आज कोरड भासणार..
जिवंतपणी कोणाला अस्तित्व मारणार..
आता फक्त नुसत्या आठवणी टोचणार..
नको हा त्रास इतका.. आज ना उद्या ते घडणार..
मानवी अपेक्षांचे ओझे.. मी इथेच झटकणार..
वेळ [...]

एक आयुष्य....

एक आयुष्य  प्रत्येकाला लाभलं आहे आणि आपण ठरवतो की कसे जगावे.
माहीत नाही कधी काय होईल…. वाटायला नको की…. अरे! आयुष्य तर संपलं पण जगणं राहूनच गेलं…..

एक आयुष्य …खोलगट दरी
उतार घसरणं भीतीच भिती

एक आयुष्य …बिनधास्त वारा
बेधुंद वाहतो…बेफिकिरीत सारा

एक आयुष्य …मोत्याचा दाणा
जपून ठेवून.. नुसताच [...]

टोटल फ़िल्मी

आओ बच्चो तुम्हे कराएँ
फ़िल्मी दुनिया की सवारी
गानेकी शुरुवात होगी फ़िल्मी
पर ending होगी हमारी

तभी तो…

” कभी कभी मेरे दिल मैं
ख़याल आता है ”
एक ‘हटेली’ Love story लिखनेमे
अपना क्या जाता है 

तो अर्ज किया है …..

” घर से निकलते ही , [...]

ती सकाळ

मी आठवते ती सकाळ…डोगंराना मेघांची चादर..

वाऱ्यातला तो नवा गारवा अन् इवलस दव पानावर..

सकाळच कोवळ उन..शेकोटिचा गरम सहवास

चेहऱ्यावर सोनेरी छटा, सोबत फक्त तुझा भास..

जशी वहिची कोरी पानं, वाट बघतात शब्दांची

माझ्या हाताला अजुन सवय तुझ्या बोटांच्या स्पर्शाची

गालावर गुलाबि थंडीचा हा गोडवा..

तुमचे आमचे same नसत

म्हणे प्रेम म्हणजे प्रेम असत

तुमचे आमचे same असत

मग का कोणाचे pass असत

तर कोणाचे fail असत

कोणासठी ते गुलाबी थंडी असत

तर कोणासाठी मखमली उब असत

वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यातील तहान असत

तर त्याला जाताना पाहणाऱ्याच्या डोळ्यातील त्राण असत

प्रेयसीच्या हसण्यातील कोमलता असत