राजे तुमच्या वेळी असे नवते. सर्वे कसे सुखी होते. तुमचे राज्य म्हणजे श्रींचे राज्य होते. पण आता ती परिस्थिती नाही, किती बिकट काळ आला आमच्यावर. ह्यावर एकच तोडगा, तुम्ही परत जन्माला यायला हवे, बस तुम्ही परत जन्माला आलेच पाहिजे. काय आहे ना की आमच्या मनगटात दम नाही, आम्हाला आमचे नुकसान ही नाही करून घ्यायचे, त्यामुळे ऐता बकरा हवा आहे. मला रोज ब्लॉगिंग पासून वेळ नाही होत, माझे बाकी सर्व सवंगडी चूल-मुल खेळत आहेत, त्यांनी ही वेळ नाही, सो इन शोर्ट आम्हाला ह्या लष्कराच्या भाकऱ्या थापायला वेळ नाही, तुम्ही परत जन्म घेतलाच पाहिजे. तुमच्या काळी इतका व्याप नवता हो, इंटरनेट नवते, चाटिंग नसायचे, सोशल नेटवर्किंग नसायचे, तुमचे आपले बरे होते ७ बायका गुण्यागोविंदाने नांदल्या, पण आता तसे नाही, एक गर्ल फ्रेंड नीट नाही टिकत. सुराज्य कसे करावे ह्याचे धडे तुम्ही दिले पण मैत्रीण कशी टिकवावी हे नाही शिकवले. परत बाजारात कॅम्पी टीशन वाढले आहे, आता हेच पहा ना सावंताची राखी सिलिकॉनची ठिगळे लावून मिरवते, ते आता इतरांना कॉपी करावेसे वाटतेच ना, म्हणून तुम्ही परत जन्म घेतलाच पाहिजे

Image: Wikipedia
तुमचे राज्य पाहायला मी तर नवतो, त्यामुळे तुमच्या काळी अमुक होते व अमुक नवते हे नाही सांगू शकत, पण सध्या काय आहे ते नक्की सांगू शकतो. कसे आहे ना, की तुम्ही गेल्या पासून आम्ही नांगी टाकली. शिवबा गेले आणि आम्ही षंढत्व स्वीकारले. जय भवानी ! जय शिवाजी ! च्या ऐवजी ‘राजे तुम्ही परत जन्मायला हवे ‘ हि घोषणा स्वीकारली. काही ही झाले की, ती घोषणा वापरायची. सध्या तो आम्हाला चळ लागला आहे. सध्याचे आमचे जे राजकारणी बुद्धीजीवी आहेत त्यांनी ही सवय लावली आहे. काही झाले, कुठे ही अन्याय झाला की बंड करण्या ऐवजी ” राजे तुम्ही नाही म्हणून असे झाले” म्हणतो आणि जाता जाता राजे तुम्ही परत यायला हवे असा शेरा ही मारतो. औरंझेबाला (अन्याय) तोंड देणे, ह्या कलेला आम्ही तुमच्या बरोबरच तिलांजली दिली. मी बरा आणि माझे कुटुंब बरे. फार तर फार काय शिवाजी ने जन्म घ्यावा पण शेजारच्या घरात.
ते खरे आहे म्हणा. आता जिजाऊ ही जन्म घेत नाही, त्यामुळे तुम्हाला जन्म नाही आणि तुम्ही नाही म्हणून आमच्यातला तानाजी, किंवा बाजी प्रभू बाहेर पडत नाही, पडतात आमच्यातून बाहेर फक्त बाजी घोरपडे. आमची मर्दुमकी पानिपतात संपली, आता जे काही उरली आहे तिचा वापर आम्ही रात्रीच्या वेळी लोकल मध्ये बलात्कारासाठी करतो, आणि सकाळी परत म्हणतो –राजे असते तर रंझ्या च्या पाटलाची गत केली तशी ह्याची केली असती —- तुम्ही परत यायला
तुमच्या मावळ्यांनी सध्या नवीन उपक्रम चालू केला आहे- आत्महत्या करणे. निसर्गाने शेतीकाडे पाठ फिरवली, आणि हलाहल केले त्याला. सोपा मार्ग, स्वताचा जीव देणे आणि मोकळे होणे. तुमचा जन्मच दुष्काळात झाला होता, तेंव्हा ही सावकारी होती, पण आत्महत्या इतक्या होत नव्या. आता ही गोष्ट फार जुनी आहे म्हणा, आम्हाला विसर पडला आहे, पण तुम्ही परत जन्माला या हे म्हणयला काय जातय ? महाराज असते तर अशी परिस्थिती नसती, बरोबर आहे महाराज पडणार होते आभाळातून पाउस. सध्या अजून एक फॅड आहे, तुमच्या नावाने कुठेही कधीही दुर्बलता व्यक्त करयची. ज्याने उठावे खडू घ्यावा आणि रंगवाव्या भिंती, राजे तुम्ही परत यायला हवे, दिसली भिंत रंगवा तिला, दिसली गाडी रंगवा तिला, जिथे मिळेल तिथे रंगवा तुमचे नाव. क्रिया करायला मात्र आम्ही थोडे बिझी आहोत. तुमच्या सारखे उभा अडवा महाराष्ट्र घोड दौड करायला खरेच वेळ नाही, केली ही असते पण संध्याकाळी घरी उशीर झाला की बायको ओरडते हो. परत चिऊला शिकवणीवरून आणायचे असते ना. कॉन्वेंट चा अभ्यास नाही म्हटला तरी जड जातो हो आपल्याला. कसे तुम्ही संभाजीला मोठे केले कोणास ठाऊक, तुम्ही खरेच परत जन्म घ्या. मोठी होऊन डॉक्टरच होणार असे चिऊ म्हणते आणि पुढे अमेरिकेत सेटल होण्याची जिद्द आहे तिची. आता हे सर्व जमवून आणायचे म्हटले की मग तुमच्या सारखी घोड दौड नाही शक्य. म्हणून एक विनंती ..की तुम्ही परत जन्माला या.
असे नाही की आमचे रक्त नाही उसळत, ते उसळते की, आता तूर डाळीचा भाव वाढला किंवा कांदा परत महाग झाला की राग असा अनावर होतो, अंगाची लाही लाही होते की. असे वाटते की त्या साठेबाजी करण्याऱ्या वाण्याला भर चौकात मारावा पण हिम्मत नाही होत. पण काय त्रास मला एकट्यालाच होतो का ? नाही ना मग मी एकटा का मारू त्याला , इतर लोक ही करतील ते काम असा विचार ही येतो मनात. राजे तुम्ही ना परत जन्म घ्याच, असे नाही की तुम लढो हम कपडे स्माभालते हैन, पण आमच्या पृष्ट्भागात दम नाही हो. दम असतो आमच्यात पण फक्त राजकीय घोषणांना साठी. कोण्या राजकीय नेत्याची सभा असली की आम्हाला जोर असतो, तुमचे नाव त्याने घेतले की तो आम्हाला आमच्या घरचा होतो, भले तो गुंड असो, काही नेते तुमचे नाव त्यांची खाजगी जागीर असल्या सारखे घेतात, पण ते आम्हाला चालते. तेवडाच तुम्हला कोणी तरी वाली . तशा सभांना म्यानीतून तलवारी उपसल्या जातात, आता असे का करतात ते नाही मला नाही ठाऊक पण पाहून बरे वाटते. हे आमचे नेते तुमच्या विपरीत आहेत, तुम्ही राज्याभिषेक नाकारला, हे नुसते इलेक्शन चे तिकीट नाकारले तरी बंड करतात, त्यांचा राज्याभिषेक होणार असेल आणि तो कोणी नाकारला तर खून ही करतील. आम्ही हतबल आहोत, आम्ही ह्यांनाच निवडून देणार (न मतदान करता ) म्हणून तुम्ही परत आले पाहिजे. तुम्ही परत जन्म घेतला की , तुम्ही ह्या शैस्ता खान (नेते) ला मारणार की नाही ते माहित नाही, आम्ही आपले काही नहीं करणार पण तुम्ही परत जन्म घ्या.
आम्ही एक ठरवले आहे स्वतः काही नाही करयचे, फक्त तुमच्या जन्माची वाट पहायची, काही कठीण प्रसंग आला की दे तुमच्या नावाने आरोळी, कुठे हतबलता आली की दे तुम्हाला हाक. हा महाराष्ट्र उभा करताना तुम्ही जे श्रम घेतले, जो त्याग केला त्याचा आम्हला कधीच विसर पडला आहे, माहित आम्हाला एकच आहे की महाराष्ट्र वाचवणे ही शिवाजी ची ड्युटी आहे, आमची नाही. आम्ही तुम्हाला त्याची जाणीव करून देणार, आणि तुम्ही जन्म का घेतला पाहिजे हे वारंवार सांगणार. तुम्ही जे केलं आणि जे घडवून दाखवले ते कर्म आम्ही नाही करणार, तो कॉपी राईट तुमचा आहे.
आमच्या नळाला पाणी नाही आले की तुम्हाला हाक देणार, राज्यात दंगली (ज्यात आम्हीच एक मेकांना मारतो ) झाल्या की तुम्हाला हाक, दुष्काळ पडला, पूर आला की तुम्हाला हाक, सामाजिक बांदिलकी तुटत आहे, शेजारी कोण राहते ते माहित नाही (मग तिथे शिवाजी परत जन्माला आला कसे कळणार ) म्हणून तुम्हाला हाक, प्रत्येक जन फक्त आपला स्वार्थ पाहत आहे, नाते संबंध पाहत नाहीत, नवरा बायकोला मारतो, तर कधी बायको कोणा दुसऱ्या बरोबर पळून जाते, (तुम्ही जन्माला या म्हणजे ती परत येईल ) जोश्यांच्या मुलीला मुल होत नाही (आता तिथे तुम्ही काय करणार ? पण या परत जन्माला ), आम्हाला राहायला घर घेता येत नाही, शेजारच्या दीपकला प्रोमोषण मिळते मला नाही, बॉस रोज ओरडतो, सावंतांची राखी सिलिकॉनची ठिगळे लावून मिरवते, खायला पैसा नाही पण कष्ट आम्ही नाही करणार, आम्ही जेधे, आम्ही भोसले मग खालच्या दर्ज्याची कामे कशी करणार ? मरण आले तर बेहत्तर पण विधार्ब सोडून मुंबईत काम नाही करणार. अनेको अनेक समस्या आहेत, त्या मोजत बसणार, त्यावर रडणार, पण त्यावर मात नाही करणार, म्हणून तुम्ही जन्माला आले पाहिजे. तुम्ही परत काबाड कष्ट करून आम्हला बसल्या जागी खायला- राहायला दिले पाहिजे.
राजे तुम्ही परत जन्माला आलेच पाहिजे – ही आमची इच्छा !! भले ती श्रींची इच्छा नसो !!
Read more on the same topic:
Amazing! Dagadu’s back with sarcastic satire! It will take a while before I could digest every word and every question you’ve raised. At the same time, I accept that we aren’t doing as much for the Maharashtra that Shivaji carved from scratch (please don’t judge me for being “separatist”).
Amol thanx for those words .. I just wrote what I see ..
दगडुदादा,
दगडमारु, झापडमारु लेख !
आजवर लिहिलेल्या सर्व लेखांमध्ये हा सर्वात आवडला.
उपरोधक शैलीत आजच्या समाजाचं आणि मानसाचं (मानस) अतीशय वास्तववादी दर्शन.
- गुंडप्पा
Apratim Lihala aaheys !
@Gundappa Thanx for the shruti-suman
@Shruti thanx for appreciation
Imazing yaar! Zop udel ka sarvanchi? Atta tari jage va yaar!!!!!!!!!!!!!!!!!!!!!