उतीष्ठ महाराष्ट्र

दगडू उवाच :

पानिपताचे शौर्य भाळी कुंकू म्हणून लावणारा माझा महाराष्ट्र, शिवबाचे गुण गात न थकणारा माझा महाराष्ट्र , आज हताश आणि इतका  षंड का ? ह्या मातीची थोरवी संपली का  नासातून  वाहणारे रक्त गोठले ?shivaji maharaj

औरंगझेबाला चिरडनारया ह्या मातीलां आता एक हि वाली नाही ?  कसी कि कला जाती अगर  तुम न होते , हि वाक्ये काय महाराजांना त्यांच्या  कीर्तीची जानेव करून देण्या साठी आहे का ?, कि जय भवानी जय शिवाजी फक्त राजकीय सभान पुरते मर्यादित आहेत? ज्याने यावे आणि मराठी ची अवहेलना करावी, आणि ती आपण नुसती पहावी?

मराठीची द्रौपदी होई पर्यंत वाट पाहणार का ? तिचे वस्त्रहण झालेच पाहिजे का ? आणि कोण कृष्ण येणार आहे तिच्या मदतीला ? इतके तर गयेगुजरे  राष्ट्र नाही हे. थोडा स्वाभिमान करा जागा . अजून पाठीचा कना नाही मोडला हे दाखवूद्या.  जो येईल त्याचे पाय का चेपावे, किती दिवस जी हुझुरी करणार? बस करा कि आता. कोणी  दीड शहाण्याने  आपणास घाटी म्हणवे, आणि ते आपण ऐकून घ्यावे. मराठी हि मोलाकर्नीची भाषा केली , तरी आपण गप्प.

मंदिराची घंटा बरी, ती टोला मारल्यावर वाजते तरी, आणि आपण जो येतो तो वाजवून जातो तरी गप्प. मी राज ठाकरे-वादी नाही अजिबात नाही, कोणास मारावे, ह्याच राष्ट्रातील इतर नागरीक्ना हाकलून द्यावे हे मला पटत नाही. हो तरी पण परिस्थिती तीच आहे ह्यास डोळे मिटून चालणार नाही. आप्यला ह्या स्थितीला आपणच कारणीभूत आहोत. पण त्यांनी जो मुद्धा मांडला आहे त्यात दम आहे . तरी त्यांचा मार्ग मला पटत नाही .

जॉब्स नाहीत, हे जरी म्हणत असलो तर स्व कमाई  करण्यास नकार आहे. हवा आहे प्रत्येकास रुबाबदार जॉब. कष्ट करायला  आमची तयारी नाही. जर ती तयारी असती तर आज शिंदे, पाटील  हे हि पोलीस ऑफिसर , कमीत कमी इन्स्पेक्टर नक्की असते, नुसते हवालदार होवून समधानी नसते. पांडू नेहमी ऑफिस बॉय राहिला नसता, बाहेरून येनाआरा पांडेय, म्हणे मला पंद्येजी म्हणा , पण पांडूला कोणी हि आहो पांडू नाही म्हणत, त्याचे मूळ नाव पांडुरंग तर दूरची गोष्ट आहे. घरकी मुर्गी डाल बराबर !

पक्षात इलेक्शन साठी तिकीट नाही मिळाले तर सगळे  बंड करण्यास तत्पर , पण राज्यात शेतकरी मार्तोई, तिथे नाही कसले हि बंड. मारतोय तर मारून दे.  विधार्भ पार तापून राख झाला तरी चालेल पण त्यासाठी आम्ही लढा नाही देणार.

गम्मत वाटते मला साहित्यीकांची. राज ठाकरे च्या बाजूने किंवा विरोधात उभे राहा असे मी नाही म्हणत. ते राजकारणी आहेत त्यात फार रस नाही, पण ह्या माय भूमी साठी तरी उभे राहा. एके काळी महाराष्ट्र युती साठी आख्खे  रान पेटवणारा साहित्यिक समाज इतका गप्पा का, हे समजत नाही. का गेली धार कलमाची न्यू योर्क वा न्यू जर्सी ला राहून. सुना मुलां मध्ये रमून विसर तर नाही न पडला ह्या मातीचा?.

माझ्या  लेखणीत ती धार नाही, आणि ती धमक सुद्धा नाही , पण मुंबईत मंत्रालया  बाहेर फाटक्या  कपड्यात उभी मराठी नाही पाहवत. अजून किती दिवस ती तशी राहणार, कधी तो शेजार च्या घरात शिवाजी जन्म घेणार कोणास ठाऊक. किती दिवस मारावी हाक अजून शिवाजीच्या नावा  खाली, का जन्म घेत नाही शिवाजी परत ? का जिजाऊनी जन्म घेणे सोडले आहे. कदचीत हे प्रश्न निरर्थक आहेत.

पार मुलखातून येणारयान ची घृणा करायला वेळ आहे, पण त्यांच्या पासून धडा नाही घेता येत. बिहार , युपी मधला शेतकरी मुंबईत येवू शकतो मग विधार्भातला का नाही येत ? अजून किती दिवस हरी ने खटल्या वर द्यायचे. त्याला हि काही लिमिट्स असतील ना.

प्रश्न अनेक आहेत आणि समस्या त्याहून  अधिक आहेत.परिस्थिती समोर लाचार होणे चांगले , कि निवत बसावे  स्वताला षंड समजून. मी एकटा काय करणार हा कॉम्प्लेक्स  कधी जाणार आपल्यातून.

VN:F [1.9.3_1094]
Rating: +1 (from 1 vote)

Post to Twitter

Read more on the same topic:

  1. ‘माय’ मराठी
  2. ‘ जराठी ‘
  3. Chat मिक्स
  4. राजे तुम्ही जन्माला …….
  5. Tawalkar Natakwaale — Gondhal Madiyela !

4 comments to उतीष्ठ महाराष्ट्र

  • Suhas

    दगडू, सही शाल जोड़ीतून मारला आहेस.

  • Suhas

    दगडू शाल जोडीतुन मारला आहेस. समस्या आहे की, पांधरपेशी(क्षमस्व) वर्गाच्या जाणिवा बोथट जहाल्या आहेत. गरुड़ झेप घेण्यासाठी घरोघरी जीजाऊ सारख्या मातोश्री असल्या पाहिजेत. महाराष्ट्रात फिरोदिया, अम्बानी फोर्ब्स लिस्ट मध्ये आहेत. पण त्याना तिथे जाण्यासाठी मराठी लोक आहेत ना. उदाहरनार्थ…चार्टर्ड एकाउंटेंटस, एन्जिनीर्स अनी बरेच…चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानतो .
    बरे असो …शिवाजीच्या जन्माची वाट न पहाता, जे मराठी लोक झगडत आहेत त्याना मोठ्या मनाने मदत केली तरी खुप आहे.

  • Amol Naik

    Unfortunately, Dagadu is not available for the reply to your comments, Suhas!

    But thanks sincerely, for reading it through…!!!

  • and me back !! Suhas thanks for the patient reading, and like you i hope the rest readers too get the message.

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>